औरंगाबाद- राज्यात डान्स बार बंदी व्हावी यासाठी आर.आर.पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर अनेकदा सुनावण्या झाल्या. आज १७ जानेवारी २०१९ रोजी याबाबत अंतिम सुनावणी झाली. अंतिम सुनावणीत न्यायालयाने डांस बार बंदी रद्द केली. त्यावर विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस असून, आबा मला माफ करा, मी शेवटपर्यंत लढा दिला पण दुर्दैवाने न्याय मिळाला नाही असे ते म्हणाले आहेत.
२०१६ सालचा केलेला कायदा त्वरित रद्द करावा, महाराष्ट्राला डान्सबार संस्कृती परवडू शकत नाही. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वर येईल, अनेककुटुंब उध्वस्त होतील. आपण मागच्या काळामध्ये बघितले, डान्सबार बंद होता त्यावेळी
सुद्धा ठाणे, मुंबई, पालघर या परिसरामध्ये अनेक ठिकाणी पोलिस प्रशासनाने धाडी घातल्या होत्या,यामध्ये करोडो रुपये जप्त झाले होते, अनेक मुली त्याठिकाणी सापडल्या. त्यामुळे राज्य सरकारने सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता
तात्काळ २०१६चा कायदा रद्द करण्याच्या हालचाली सुरूकराव्या, कायदा रद्द करावा अन्यथा आर.आर.पाटील फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईलअसा इशारा त्यांनी दिला आहे.
याशिवाय विनोद पाटील यांनी स्पष्ट केले की, आमची तज्ञ वकिलांशी चर्चा चालू आहे. जर शक्य असेल, कायद्यात मुभा असेल तर आम्ही रिव्ह्यू पिटीशन दाखल करणार आहोत.